IPL 2021 च्या संपूर्ण स्पर्धा स्थगित

 मुंबई : करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्व भूमीवर  आयपीएलच्या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे.

“सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का; कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल,” असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like