गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नेत्रदान चळवळीला खीळ आली आहे

जळगावा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे नेत्रदान चळवळीला खीळ आली आहे.दि.१० जून रोजी जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी समाजमाध्यमावर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आणि नेत्रदान चळवळीत सामील होण्यासाठी आवाहन केले.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश कौतिक पाटील आणि सदस्य जितेंद्र नामदेव पाटील यांनी तात्काळ डॉ.पाटील यांची भेट घेत जळगावातील मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे उपलब्ध असलेले नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून दिले. नेत्रदानाच्या या चळवळीत सर्व दिव्यांग बांधव यापुढे सक्रिय होतील असे गणेश पाटील यांनी आश्वासन दिले. नेत्रदान संकल्प पत्र भरून दिल्यावर मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे नेत्रदान संकल्प कार्ड त्यांना देण्यात आले. यावेळी गणेश पाटील हे म्हणाले की, दिव्यांग असल्याने अंधव्यक्तीचे दुःख मी समजू शकतो मरणोत्तर माझ्या नेत्रदानाने अंध व्यक्ती बघू शकेल याचा आनंद मला आहे.

दोन वर्षांपासून कोविड १९ मुळे नेत्रदान चळवळ मंदावली आहे.तरुणांनी या चळवळीत सामील झाले पाहिजे.जळगावातील मांगीलालजी बाफना नेत्रपेढीत नेत्ररोपण सेवा उपलब्ध आहे.इच्छुकांनी नेत्रदानाचा फॉर्म नेत्रपेढीत भरून दयावा. असे आव्हाहन डॉ.धर्मेंद्र पाटील- प्रमुख,आरोग्य विभाग, केशव स्मृती प्रतिष्ठान यांनी केले आहे

You May Also Like