बापरे! अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना मोजावे लागताय 70 हजार?

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून करोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र असं असले तरी मृतांचा आकडा हा वाढतो आहे असे दिसुन येतेयं. करोनामुळे देशातील तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर पाहायला मिळत असतानाच मृतांची संख्या वाढत आहे. नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सौदा करावा लागत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

हैदरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील लोकांना खूप पैसे द्यावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अंत्यसंस्कारासाठी वेटिंग लिस्ट असून त्यासाठी बक्कळ पैसे मागितले जात आहेत. हैदराबादमध्ये कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 70 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त आठ हजार घेता येतील असं निश्चित केलं आहे. एखाद्या व्यक्तीचं सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना उपचारांदरम्यान निधन झालं किंवा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यास त्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

 

You May Also Like