मुंबईत धावली होती आजच्या दिवशी पहिली बस; 95 वर्षांचा रंजक प्रवास

नवी दिल्ली | देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई शहराची शानच काही और आहे. ब्रिटीश काळापासून सतत आघाडीवर असणार्‍या या वैशिष्ट्यपूर्ण शहराचा स्वतःचा असा एक वेगळा इतिहास आहे. त्याची एक वेगळी संस्कृती आहे. ज्यामुळे हे शहर नेहमीच इतर शहरांपासून वेगळं ठरलं आहे. हे शहर अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. आज अशाच एका ऐतिहासिक सेवेचा वर्धापनदिन आहे. ही सेवा आहे मुंबईतील बससेवा. 1926 मध्ये आजच्याच दिवशी देशात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी बस धावली.

एका कंपनीपासून सुरुवात 
1995 पर्यंत बॉम्बे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन ही कंपनी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखली जात होती. 1873 मध्ये ट्रामवे सेवा देणार्‍या बॉम्बे ट्रॅमवे लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीने नोव्हेंबर 1905मध्ये वाडी बंदर इथं एक औष्णिक उर्जा केंद्र स्थापित केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट या कंपनीनं सुरू केलेली ही बससेवा मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली बस सेवा होती. अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती. नंतर सरकार आणि बीएमसीच्या आवाहनानुसार कंपनीनं 1934 मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. 1937 मध्ये डबल डेकर बस वापरात आणली गेली. मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बस सेवा 1940 मध्ये कुलाबा ते माहिमदरम्यान चालवण्यात आली होती. बेस्ट सेवा सुरू केली गेली तेव्हा मुंबईकरांनी तिचं मनापासून स्वागत केलं. परंतु टॅक्सी चालकांनी याला तीव्र विरोध केला होता. त्यांनी संपही केला, तरीही वर्षभरात 6 लाख लोकांनी या बससेवेचा लाभ घेतला होता. यानंतर ही संख्या वाढून 38 लाखांवर गेली होती.

असे बदलले नाव 
1926 मध्ये, बेस्ट ही बससेवा देणारी कंपनी बनली. 1947 मध्ये, बेस्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कंपनी बनली आणि तिचं नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई आणि ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट करण्यात आलं. 1995 मध्ये बॉम्बेचे नाव मुंबई ठेवले गेले आणि त्याचबरोबर या कंपनीचं नावही बदलून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक असं ठेवलं गेलं तरीही ती बेस्ट म्हणून ओळखली जाते.

1865 मध्ये सुरू झाला होता अशा बस सेवेचा विचार
मुंबईची लाईफलाईन असणार्‍या बेस्टची सुरुवात रातोरात झालेली नाही. 1865 मध्ये, मुंबईत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले. तेव्हा एका अमेरिकन कंपनीनं घोड्याच्या सहाय्यानं ओढल्या जाणार्‍या ट्राम सेवेच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. 1873 नंतर बॉम्बे ट्रॅमवे कंपनी लिमिटेडनं मुंबईत घोड्याच्या सहाय्यानं ओढल्या जाणार्‍या ट्राम चालवल्या.

 

You May Also Like