सक्तीचा लॉकडाउन योगी सरकारला मान्य नाही ; गाठणार सर्वोच्च न्यायलय

उत्तर प्रदेश : संपूर्ण देशात सध्या करोना रुग्णांची संख्या चिंतादायक आहे. अनेक राज्यातील परिस्थितीही अतिशय गंभीर आहे. दरम्यान,उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेश सरकारला दिलाय.

मात्र उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने या निकालाविरोधात आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. मागील २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये २८ हजार २८७ करोना रुग्ण राज्यात आढळून आले असून १६७ जणांचा मृत्यू झालाय. असं असतानाही योगी सरकारने लॉकडाउनला विरोध केला असून आजच अलहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात योगी सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये रविवारी दिवसभरात ३० हजारांहून अधिक रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. राज्यातील विलगीकरण केंद्रांची अवस्था आणि करोना रुग्णांवरील उपचारांची परिस्थिती याबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर न्या. सिद्धार्थ वर्मा व न्या. अजित कुमार या न्यायाधीशांच्या खंडपीठाने कठोर लॉकडाउन लागू करण्याचा आदेश दिला. ‘सध्याची परिस्थिती पाहता लोकांना सुरुवातीला एका आठवड्यासाठी घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले, तर करोना संसर्गाची सध्याची साखळी तोडली जाऊ शकते. यामुळे वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल’, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

तसेच, वित्तीय संस्था आणि वित्तीय विभाग वगळता वैद्यकीय व आरोग्य सेवा औद्योगिक व वैज्ञानिक आस्थापना, नगरपालिकांच्या कामकाजासह आवश्यक सेवा व सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व सरकारी व खासगी आस्थापना २६ एप्रिलपर्यंत बंद राहतील. तथापि, न्यायपालिका स्वेच्छेने कामकाज करेल, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like