भारतात चौथ्या लसीचे होणार आगमन

सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्यास मान्यता
नवी दिल्ली : सिप्लाला मॉडर्नाची लस आयात करण्यास मान्यता दिली आहे. सिपलाने आपत्कालीन वापरासाठी लसीची आयात व विक्री करण्याची परवानगी मागितली होती. सरकार लवकरच या निर्णयाची घोषणा करू शकते.
अशी माहिती सुत्रांकडुन मिळतेयं.

दरम्याण, अमेरिकन सरकारनेही मॉडर्ना कोविड -19 लसीचे डोस ठरवलेल्या संख्येत भारताला डोनेट करण्याची मंजूरी दिलीयं. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून आपत्कालीन वापरासाठीही कंपनीने मान्यता मागितली आहे.

 

ब्रिजिंग ट्रायलची नसणार गरज
मॉडर्ना आणि फायझरचा अशा कंपन्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी भारत सरकारला आवाहन केले होते की, त्यांनी आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर होणारी स्थानिक चाचण्यांची गरज भागवावी. लस वापरल्यानंतर होणार्‍या दुष्परिणामांची हानी किंवा जबाबदारी यासारख्या परिस्थितीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही.

 

फायझर आणि मोडर्ना यांनी अशी अट घातली आहे की जर नुकसानभरपाई मिळाली तरच ते लस भारतात पाठवतील. ही नुकसानभरपाई लस कंपन्यांना सर्व कायदेशीर उत्तरदायित्वापासून मुक्त करते. भविष्यात या लसीमुळे काही गडबड झाल्यास या कंपन्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकत नाही.

You May Also Like