पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार पीडित मुलगी ही अंधेरी पूर्व परिसरातली

अंधेरी : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला सहार पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी ही अंधेरी पूर्व परिसरात राहते. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकराकडून मुलीच्या मामांना धोका आहे, अशा भूलथापा मारून पित्याने स्वतःच्या मुलीचे नकोसे फोटो तिच्याकडून घेतले. एवढय़ावर न थांबता स्वतःच्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास सर्व विघ्ने दूर होतील असे मांत्रिकाने सांगितल्याचे भासवून तो मुलीवर अत्याचार करत होता. गेल्या दोन वर्षांपासून वडिलांच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. तिने याची माहिती तिच्या प्रियकराला दिली. त्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद करून पित्याला अटक केली. पित्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

You May Also Like

error: Content is protected !!