शेळीनं दिला आठ पायांच्या पिलाला जन्म ?

बानगाव । येथील  एका शेळीनं 8 पाय आणि 2 कूल्हे असणाऱ्या पिल्लाला जन्म  दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दि . १6 जुलै रोजी सरस्वती मोंडल नावाच्या महिलेच्या शेळीनं या पिल्लाला जन्म दिलाय.  सध्या या शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी मोंडल यांच्या घरी गर्दी केली होती.

 

पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथे घटना घडली आहे. बनगाव येथील रहिवासी असणाऱ्या सरस्वती मोंडल यांनी घरी काही गायी आणि शेळींचं पालन केलं आहे. दरम्यान 16 जुलै रोजी मोंडल यांच्या एका शेळीनं दोन पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक पिल्लू सामन्य होतं, तर दुसऱ्या पिल्लाला 8 पाय आणि दोन कूल्हे होते. आठ पाय आणि दोन कूल्हे असणाऱ्या या शेळीच्या पिल्लाला पाहून मोंडलही घाबरुन गेल्या होत्या.

मात्र,  जन्मानंतर काही मिनिटांतच संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मोंडल यांच्या शेळीनं आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली होती. त्यामुळे गावातील अनेक लोकांनी मोंडल यांच्या घरी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.  सरस्वती मोंडल यांना याबाबत विचारलं असता त्यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, ‘आठ पायांच्या पिल्लाला शेळीनं जन्म दिल्याची घटना मी पहिल्यांदाच पाहत आहे. याचं मलाही आश्चर्य वाटत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, आठ पायांच्या पिल्लाचा जन्मानंतर अवघ्या पाचच मिनिटांत मृत्यू झाला आहे.

You May Also Like