करोनाबाबत सरकारनं दिली गोड बातमी; ब्लॅक फंगसनं वाढवली चिंता

नवी दिल्ली : देशभरात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. केंद्र सरकारनं शनिवारी दिलासा देत सांगितलं आहे, की देशात करोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली जात आहे. मात्र, सरकारनं दुसरीकडे ब्लॅक फंगस म्हणजेच म्यूकरमाइकोसिसबाबत नागरिकांना सावध केलं आहे.

नीति आयोगाचे सदस्या डॉ. व्ही के पॉल म्हणाले, की ब्लॅक फंगस आटोक्यात आणण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. डॉ. पॉल म्हणाले, की मधुमेह असणार्‍यांना याचा जास्त धोका आहे. त्यामुळे, मधुमेह नियंत्रित करा, कारण यामुळे मृत्यूचा धोका अधिक वाढतो. हे तेव्हाच होत आहे जेव्हा करोना रुग्णाला स्टेरॉइड दिलं जाते. त्यामुळे, स्टेरॉइट अतिशय जबाबदारीनं द्यायला हवं. ते म्हणाले, की म्यूकरमाइकोसिसची प्रकरण झपाट्यानं वाढत आहेत आणि अनेक राज्यांमधून ४०० ते ५०० केस समोर आल्या आहेत.

डॉ. पॉल म्हणाले, की या आजारासोबत कसं लढायचं याबाबत अधिक माहिती सध्या आपल्याला नाही. ही एक नवीन समस्या उभी ठाकली आहे. आम्ही राज्यांना यावर नजर ठेवण्यासह सांगितलं आहे. पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, चंदीगडमध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. अरूणालोके चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान देशातील सोळा केंद्रांमध्ये आलेली ब्लॅक फंगसची प्रकरणं २. ५ पटीनं वाढली आहेत. डॉ. चक्रवर्ती फंगल इन्फेक्शन स्टडी फोरमचा भाग आहेत आणि त्या सदस्यांपैकी एक आहेत, ज्यांनी म्यूकरमाइकोसिसबाबत सरकारला सूचना आणि सल्ला देण्याचं काम केलं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!