खुशखबर; तनु आणि प्रिया बनल्या वर्ल्ड चॅम्पियन

बुडापेस्ट । टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यापूर्वी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकत जोरदार कामगिरी केली. मुलींच्या गटात तनु आणि प्रिया यांनी सुवर्णपदक जिंकत वर्ल्ड चॅम्पियन बनल्या आहेत.

तनुने 43 किलो वजनी गटात तर प्रियाने 73 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. 65 किलो वजनी गटातील वर्षाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. 43 किलो वजनी गटात तनूने एकही अंक गमावला नाही. पहिल्या फेरीत तिने युक्रेनच्या कुलाकिवसाला 10-0, दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या मारियाला 13-0, उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या आईदाला 8-0 तर अंतिम फेरीत बेलारूसच्या वेलेरिया मिकिट्सिचला 11-0 असे एकतर्फी नमवत सुवर्णपदक पटकावले.

You May Also Like

error: Content is protected !!