यशस्वी कर्णधाराची दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार

मुंबई |  भारतीय क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट दर्जाचा डावखुरा फलंदाज, आपल्या जोशपूर्ण खेळीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करुन सहकार्‍यांचा आत्मविश्वास वाढवणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली होय. दादाची दादागिरी पाहण्यासाठी करोडो चाहते मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आज अखेर सौरवने सांगितले कि, आपण आपल्या क्रिकेट जीवनावर बायोपिक करण्यास होकार दिला असल्याची माहिती दिली.

 

गांगुली म्हणाला कि, मी माझ्या जीवनावर बायोपिक बनवण्यास होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार असून आताच दिग्दर्शकाचे नाव सांगू शकत नाही. या सर्वासाठी आणखी काही दिवस जातील समोर आलेल्या माहितीनुसार ही एक बिग-बजेट फिल्म असणार आहे. एखादे मोठे प्रोडक्शन हाऊस तयार करणार असलेल्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 200 ते 250 कोटीच्या घरात असणार आहे.

 

सौरव गांगुलीचे मैदानावरील वावरणे अगदी अंग्री यंग मॅनसारखे होते. त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबद्दल बोलताना गागुंलीने रणबीर कपूरचे नाव जाहिर केले आहे. तसेच आणखी दोन हिरोंबाबतही विचार होत असल्याचं त्याने सांगितंल. या चित्रपटात गांगुलीची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द अगदी पदार्पणापासून ते आता बीसीसीआय अध्यक्ष होण्यापर्यंत दाखवण्यात येणार आहे.

 

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर बायोपिक तयार करण्यात आले असून यातील सुशांत सिंग राजपूतने साकरलेल्या एम एस धोनीचा बायोपिक सर्वांत हिट ठरला आहे. तसेच मोहम्मद अझराऊद्दीनचा इम्रान हाश्मीने साकारलेले बायोपिकही चांगला गाजला. सचिन तेंडूलकरच्या जीवनावरही डॉक्यूमेंटरी तयार करण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयावर 83 ही फिल्म तयार होत आहे. ज्यात कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे.

You May Also Like