LOCKDOWN : सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार किराणा मालाची दुकानं

मुंबई : करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत 20 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच मोहिमेअंतर्गत सरकारने आता नवी गाइडलाइन जारी केली आहे.

राज्यातील करोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारकडूनकडून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिकाधिक कठोर केले जात आहेत. आताच मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू असणाऱ्या निर्बंधाच्या गाइडलाइन्समध्ये काही बदल केले आहे. नवीन आदेशानुसार आता किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहणार आहे.

तसच, राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, सर्व खाद्य दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री , फिश यासह, कृषि उत्पादनाशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूं वस्तूंची दुकानं देखील दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.

मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like