देशात कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.

देशात कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात कालच्या तुलनेत आज कोरोनाचा मृत्यूच्या संख्येत किंचित घट झाली असून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३४ हजार १५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ हजार ८८७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ११ हजार ४९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८४ लाख ४१ हजार ९८६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ९८९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सध्या देशात १७ लाख १३ हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

You May Also Like