अर्जेंटीनावर भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळविला दणदणीत विजय

टोकियो ।  अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला भारताने पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.  अर्जेंटीनावर मात करत भारतीय पुरुष हॉकी संघाने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला.  भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

 

 

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या अर्जेंटीनाला 3-1 अशा फरकाने पराभूत केले. अर्जेंटीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग्रुपमधील टॉप 2 संघांमध्ये सहभागी झाला आहे. ग्रुप स्टेजवर शेवटचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. शेवटच्या क्वार्टरमध्ये भारत विरुद्ध अर्जेंटीनाच्या सामन्याचा थरार पाहायला मिळाला. अनेक चढ-उतार चौथ्या क्वार्टरमध्ये पाहायला मिळाले. पण सर्वात शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर सामना खिशात घातला.

You May Also Like