शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज

कोलंबो । भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा अन शेवटचा सामना प्रेमदासा मैदानावर होत आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका पहिलेच आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात उतरताना संघ नवे बदल करुन नवख्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ज्या खेळाडूंना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली नाही त्यांना आज संधी मिळू शकते. यामुळे संघाला दोन फायदे होऊ शकतात. एकतर पहिले दोन सामने तंबूत बसलेल्या खेळाडूंचा सराव होईल आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अंतिम 11 निवडताना संघ व्यवस्थापनालाही फायदा होईल. भारताने मालिका आधीच जिंकली असल्याने अशाप्रकारचे प्रयोग भारतीय संघ करु शकतो.

भारतीय संघ सर्वात पहिला बदल कर्णधार शिखर धवनला विश्रांती देऊन आणि त्याच्याजागी दुसरा सलामीवीर संघात सामिल करुन करु शकतो. शिखर धवनच्या जागी उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला कर्णधार पद दिले जाऊ शकते. तसेच शिखर सोबत सलामीवीर पृथ्वी शॉलाही आराम देऊन देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या नवख्या जोडीला सलामीला पाठवू शकतात.

 

तिसऱ्या वनडेसाठी संभाव्य भारतीय संघ

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, संजू सॅमसन, दीपक चहर, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती

You May Also Like

error: Content is protected !!