मेस्सी-नेमार सुपरहिट जोडी पुन्हा एकदा परतणार फुटबॉलच्या मैदानात

नवी दिल्ली । अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी आणि त्याच्या बार्सिलोना क्लबचा जुना साथीदार ब्राजीलियान नेमार ही सुपरहिट जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे.  लिओनेल मेस्सीने फ्रेंच सॉकर क्लबच्या पॅरीस सेंट जर्मन  बरोबर एक करार केला आहे. या कराराची माहिती अद्याप समोर आली नाही, परंतु मेस्सी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

 

 

पीएसजी फ्रंटलाईन पहिल्यापासून ताकतवान आहे. यामध्ये बार्सिलोना टीमचा माजी खेळाडू नेमार आणि फ्रान्सचा युवा स्ट्राईकर किलीयन एम्बाप्पे असे दोन सर्वोत्कृष्ट स्ट्राइटर टीममध्ये आहे. त्यामध्ये आता मेस्सीची भर पडली आहे. अर्जेंटिना आणि बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा 34 वर्षीय मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तब्बल 21 वर्षांनी मेस्सीनं रविवारी ( 8 ऑगस्ट) बार्सिलोनाची साथ सोडली. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मेस्सी भावुक झाला होता.

 

You May Also Like