“मोदी सरकारने लक्षात घ्यावं लढाई करोना विरोधात आहे काँग्रेसविरुद्ध नाही” : राहुल गांधी

नवी दिल्ली :सध्या देशात करोना स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. दिवसगणिक ही स्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. या दरम्यान, देशांतल राजकरणाने ही वेगळच वळण घेतलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोरोनाच्या मुद्यांवरून एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सध्याची लढाई कोरोनाविरोधात आहे, कोणत्याही राजकीय पक्षांविरोधात नाही, असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“मोदी सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, लढाई करोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा इतर राजकीय विरोधकांविरुद्ध नाही,” असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, याआधीही राहुल गांधी यांनी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. “रोजगार आणि विकासाप्रमाणे केंद्र सरकार कोरोनाची खरी आकडेवारी जनतेपर्यंत पोहचू देत नाही. महामारी नाही तर महामारीचे सत्य तर नियंत्रणात केलच आहे”, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीद्वारे केली आहे. सोनिया गांधी यांनी कोरोनाविरोधातील लढाई ही ‘आम्ही विरुद्ध तुम्ही’ अशी नाही, तर ती आपण विरुद्ध कोरोना अशी आहे. ही लढाई देशाने एकजुटीने लढायची आहे, त्यासाठी राजकीय मतैक्य गरजेचे आहे, असे मत व्यक्त केलं आहे. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like