श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : भाजप सरकारला केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाले. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केलीय.

नाना पटोले म्हणाले कि, आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. करोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशावासियांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं. मग आता सत्कार कराय करताय?, असा सवाल करतानाच सुटाबुटाचं सरकार म्हटल्यावर भाजपला त्रास झाला. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं असं मोदी सरकारला वाटतंय, अशी टीका पटोले यांनी केलीयं.

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय आहे याच्या स्पष्ट गाईडलाईन्स आहेत. ओबीसींची संख्या किती आहे हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता याच मुद्द्यावरून आरोप करत आहेत. त्यांची आधीची भाषणं ऐका. खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली. घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही. केंद्राने या विषयावर निर्णय घेतला तर काहीच अडचण राहणार नाही, हे सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. मग ओबीसी आणि मराठा समाजाला त्रास का दिला जात आहे. भाजपला राज्यातील जनता कधीच माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

You May Also Like