मोदी सरकार तीन दिवसांत तीन वर्षांसाठीचा अजेंडा तयार करणार

नवी दिल्ली । एकीकडे विरोधी पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मोदी आणि भाजपानेही या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये सरकारच्या पुढील तीन वर्षांसाठीच्या वाटचालीचा अजेंडा निश्चित केला जाणार आहे.

 

गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच काही मंत्रालयांची जबाबदारी बदलण्यात आली होती. आता मंत्र्यांची ही टीम पुढील आठवड्यात तीन दिवसांची बैठक आयोजित करणार आहे. मंगळवारी संध्याकाळी सुरू होणाऱ्या या बैठकीत पुढील तीन वर्षांतील वाटचालीवर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान सर्व मंत्रालयांच्य कामाचा आढावा घेतला जाईल. तसेच पुढील लक्ष्य निश्चित केले जाईल. याशिवाय नव्या मंत्र्यांना त्यांचे विभाग आणि मंत्रालयांसंदर्भात माहिती दिली जाईल.

 

You May Also Like