राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला आहे

अहमदनगर : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकरी शेतीच्या कामाला जोमाने लागला आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन मोठी विधाने केली आहेत. ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना एवढ्यात कर्जमाफीचा लाभ नाही’ असं वक्तव्यच डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर करत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशातच जे शेतकरी या कर्जमाफी योजनेत पात्र आहेत, अशा उर्वरित शेतकऱ्यांना ही कर्जमाफी एवढ्यातच मिळणार नसल्याचं धक्कादायक विधान डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात केलं आहे. त्यामुळे एका प्रकारे राज्य सरकार 3 लाख रुपयांपर्यंत का होईना मात्र संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात अपयशी ठरल्याची कबुलीच मंत्री शिंगणे यांनी दिली आहे.

You May Also Like