इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ

इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. त्या मालिकेत सर्वाधिक 300+ धावा करणाऱ्या फलंदाजाला संधी देऊन किवी संघानं टीम इंडियाचं टेंशन वाढवण्याची रणनीती आखली आहे. न्यूझीलंडनं 18 ते 22 जून या कालावधीत होणाऱ्या WTC Finalसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून फक्त एकाच फिरकीपटूला स्थान दिले आहे.

अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक 306 धावा चोपल्या आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!