दिलासादायक बातमी ! सोमवारी देशातील करोना रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाचा हाहाकार सुरू आहे, दरदिवशी कमालीची रुग्ण वाढ पहायला मिळते. दरम्यान, देशात मागील आठवड्यापासून दररोज करोनाचे 3 लाखाहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. रविवारीदेखील साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशात आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोमवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या  संख्येत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी 3 लाख 20 हजार 435 कोरोना रुग्णांची नोंद  झाली आहे. तर, 2764 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची मृत्यूचा एकूण आकडा 1 लाख 97 हजार 880 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या करोनाचे 28 लाख 82 हजार 513 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, देशातील नव्या रुग्णसंख्येतील ही घट महाराष्ट्रामुळेही आली आहे. राज्यात सोमवारी करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईमध्येही मागील चोवीस तासात 3,876 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

 

You May Also Like