देशातील कोरोना रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज पुन्हा कमी झाल्याची यला मिळाली

देशातील कोरोना रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज पुन्हा कमी झाल्याची यला मिळाली आहे. तर कोरोना मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. गुरुवारी ४८ हजारांवर पोहलेली कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा ४६ हजारांवर आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येतील चढ उतार गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही बदल होताना दिसतोय. देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ५९ हजार ३८४ पोहचली आहेत.

देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ०४ लाख ५८ हजार २५१ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९५ लाख ४८ हजार ३०२ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ५ लाख ९ हजार ६३७ झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ३१२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३४,कोटी ७६ लाख २३२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

You May Also Like