देशातील करोना रुग्णसंख्येने केला दीड कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली : पुन्हा एकदा देशात करोनाने  कहर केला आहे. जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ही 14 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. करोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,50,61,919 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

तसेच, सोमवारी (19 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 78 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 19,29,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,29,53,821  रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like

error: Content is protected !!