पॉर्न पाहणाऱ्यांची संख्येत झाली चारपट वाढ

पुणे | लॉकडाउन काळात देशात इंटरनेटवर पॉर्न किंवा सेक्स व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुगलवर पॉर्न व्हिडीओ सर्च  करण्यात पुणेकरांचा पहिला क्रमांक  लागला आहे. या यादीत नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या काही काळात अनेकांच्या हातात स्मार्टफोन आल्यानं पॉर्न बघणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील  चार ते पाच वर्षांपूर्वी भारतात 857 वेगवेगळ्या पॉर्न वेब साइटवर बंदी घालण्यात आली होती. असं असूनही देशात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. विविध तांत्रिक पद्धतीचा वापर करत लोकं पॉर्न पाहतचं आहेत. अलीकडच्या काळात लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली अनेक अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलं-मुलींच्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे गुगलवर पॉर्न व्हिडीओ सर्च करणाऱ्यांमध्ये अशा शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. यामध्ये तरुणी आणि महिला देखील मागे राहिल्या नाहीत. अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

You May Also Like