नियोजनशून्य कारभारामुळे मृत्यूचे तांडव

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका
धुळे : करोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली. जनतेच्या मृत्यूसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र शासनावर नियोजन शुन्य कारभाराचा आरोप नव्हे तर ते वास्तव आहे. करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले जात आहे. करोनाच महामारीमुळे देशात ठरवून मृत्यूचे तांडव केले जात असल्याची प्रखर टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आ.नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी केली.

जवाहर फाऊंडेशन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी आमदार नाना पटोले समवेत आमदार कुणाल पाटील, माजीमंत्री रोहिदास पाटील, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे अतूल लोंढे, शाम सनेर, युवराज करनकाळ, अलोक रघुवंशी, डॉ.दरबारसिंग गिरासे, जवाहर फाऊंडेशनच्या ममता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पटोले यांनी विदर्भातून राज्यभर दौर्‍याला सुरूवात केली आहे. कोविड-19 च्या संकटकाळात काँग्रेसचे जबाबदार पदाधिकार्‍यांनी जनतेत राहून मदत कार्य केले. जनतेच्या संकटात सोबत राहणार्‍या पदाधिकार्‍यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरा असल्याचे आ.पटोले यांनी सांगितले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, करोनाच्या काळात राज्याने रेमडिसीवर मोफत उपलब्ध करून दिले. परंतू केंद्रातील सरकारने गुजरातमधील आपल्या व्यापारी मित्रांच्या फायद्यासाठी रेमडिसीवरचा काळाबाजार केला. ऑक्सिजनचीही अवस्था तशीच होती. औषध वेळेवर न मिळाल्याने घरातील कर्ते पुरूष मृत्यूमुखी पडले.

देशात उत्पादित करण्यात आलेली लस पाकिस्तानला का पाठविली गेली? हा भारतातील सर्वांना पडलेला प्रश्न आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जातो आहे. जनतेला खोटे स्वप्न दाखविले गेले. महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे, परंतू तशी स्थिती आहे ? यावर उत्तर देतांना आ. पटोले म्हणाले की, हा स्टॅटीजीचा भाग आहे. हाय कमांडने सांगितल्या नुसार आपण काम करत असल्याचा पुनरूच्चार आ. नाना पटोले यांनी यावेळी केला.

You May Also Like