तासगाव येथील रहस्यमय खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं

सांगली | तासगाव येथील रहस्यमय खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. जेसीबीच्या मालकाचा त्याच्याच कामगाराने पत्नीच्या मदतीने अनैतिक संबंधातून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

तासगावातील के. के. नगर येथे घरात हरी पाटील याच्या डोक्यात काठीने व खोऱ्याने मारहाण करून तसेच त्याचे गुप्तांग कापून निर्घृण खून केला होता. त्याचे प्रेत तसेच दोन दिवस त्यांनी घरात ठेवले. तासगाव-निमणी रोडलगत असलेल्या विहिरीमध्ये प्लास्टीकच्या कागदामध्ये बांधुन मृतदेह टाकल्याचे पती-पत्नीने कबूल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनील ज्ञानेश्वर राठोड आणि पार्वती सुनील राठोड या दोघांना जेसीबीसह पुण्यातून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तासगाव -भिलवडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपा समोर असणाऱ्या सुभाष लुगडे याच्या विहिरीत प्लास्टिक कागदात बांधलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह 10 जून रोजी आढळला होता. प्रथमदर्शनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असता तो 500 लिटर डिझेल चोरून जेसीबी घेऊन पुण्याकडे जात असल्याची माहीती मिळाली.

पथकाने तातडीने पुण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यावेळी पुणे-कोल्हापूर मार्गावर सुनील राठोड हा त्याच्या पत्नीला जेसीबीतून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यावेळी त्या दोेेघांना ताब्यात घेतले. त्यांना हरी पाटीलच्या खुनाबाबत चौकशी केली असता, सुनील राठोड याने खून केल्याची कबुली दिली.

You May Also Like