ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत हल्ल्याची शक्यता; दिल्ली पोलिसांना अलर्ट

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहेत. एजन्सींनी याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

सुरक्षा एजन्सीने म्हटले की, दि .15 ऑगस्टपूर्वी दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतातय विशेषत: 5 ऑगस्टला. कारण, याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढले होते. एकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

 

पहिल्या प्रशिक्षणात सॉफ्ट किल आहे, ज्या अंतर्गत सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे. हार्ड किल असे दुसर्‍या प्रशिक्षणाचे नाव आहे, म्हणजे जर एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी. नुकतेच दिल्लीचे पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनीही उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि ड्रोनसारख्या गोष्टींबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. जम्मू एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

You May Also Like