केरळमध्ये कोरोना संक्रमणाचा दर कमी होण्याचं नाव नाही

नवी दिल्ली : केरळमध्ये कोरोना संक्रमणाचा दर कमी होण्याचं नाव नाही. देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या काहीशी कमी होत असताना, दुसरीकडे केरळमध्ये रोज पाच आकडी नवी रुग्ण संख्या समोर येत आहे. देशात कोरोनाचे 5.52 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी एकट्या केरळमध्ये 1 लाख रुग्णसंख्या आहे. याचदरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की कोरोना काळात कोरोना रुग्णाचे कुटुंबिय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नव्हते. आता ते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकतील असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये दररोज सरासरी टेस्ट पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांच्यावर आहे. आम्ही अतिशय कमी वेळात टेस्ट पॉझिटिव्ही रेट 29.75 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत आणण्यात सफल झालो आहे. परंतु यात अजूनही कमी येण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

You May Also Like