‘देवमाणसा’चा खरा चेहरा येणार प्रेक्षकांच्या समोर! 

मुंबई : देवमाणूस  आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे.

 

 

मालिकेचा नवा प्रोमो आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

You May Also Like