आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे युएईत आयोजन, बीसीसीआयची घोषणा

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा पार पडली. यात इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनावरही चर्चा करण्यात आली.

सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आयपीएल 2021च्या पहिल्या 10 दिवसांत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही संकट आलं आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 14 सप्टेंबरला संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात होईल. भारत व इंग्लंडचे खेळाडू थेट लंडनहून यूएईत दाखल होतील. ते एका बायो-बबलमधून येणार असल्यानं त्यांना यूएईत क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण, अन्य खेळाडूंच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही.

बीसीसीआयनं परदेशी क्रिकेट संघटनेसोबत खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यात खेळतील, परंतु न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आणखी एक महिन्याची वाट पाहणार आहे. मफ आयपीएल 2021च्या उर्वरित 31 सामने 18 किंवा 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होणार असल्याची चर्चा आहे.

You May Also Like