तालिबानची ताकद वाढल्याने अफगाणिस्तानच्या चिंतेत भर 

काबुल । अफगानिस्तानमध्ये तालिबानची ताकद वाढत आहे. ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. अफगानिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी परतल्याने तालिबान्यांच्या हातात अफगानिस्तानातील अनेक शहरं येत आहेत.  तालिबानच्या महिलांविरोधातील फर्मानामुळे महिला आणि तरुण मुलींवर संकट वाढले आहे.

 

 

 

तालिबानी नेते अफगानिस्तानातील महिलांचे अपहरण आणि त्यांच्याशी सक्तीने लग्न करून सेक्स स्लेव बनवण्याचे काम करीत आहेत. तालिबानी महिलांना फक्त शरियत कायद्यानुसार वागण्यास सांगतात. तालिबान्यांना सध्या इराक आणि सीरियातील इस्लामिक स्टेटच्या कट्टर दहशतवाद्यांचे समर्थन मिळत आहे. तालिबानने संबधित क्षेत्रातील इमामांना 15 वर्षावरील मुली आणि 45 वर्षाहून कमी असलेल्या विधवा महिलांची यादी बनवण्याचे फर्मान सोडले होते. यामुळे ते तालिबानी मुलांशी या महिला आणि मुलींचे लग्न लावणार आहेत. एका रिपोर्टनुसार तालिबानी महिला आणि मुलींचे सध्या अपहरण करीत आहेत. आणि त्यांचे जबरजस्ती लग्न लावत असल्याची माहिती मिळत आहे.

You May Also Like