करोनानतंर ब्लॅक फंगसचा हाहाकार; एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के मृत्यू

नवी दिल्ली : करोना रुग्णसंख्येत घट येऊ लागल्यानं दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसनं चिंता वाढवलीय. देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या फंगल इन्फेशनचे तब्बल 5500 रुग्ण आढळले आहेत. या इन्फेशनमुळे होणार्‍या मृतांच्या आकड्यातही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत पाच राज्यांनी याला महामारी घोषित केलं आहे.

देशभरात सध्या 5500 रुग्ण ब्लॅक फंगसच्या विळख्यात सापडले आहेतं. यातील 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 90 लोकांनी या फंगल इन्फेक्शनमुळे आपला जीव गमावला आहे. तर, हरियाणा 14 आणि उत्तर प्रदेशमध्ये 8 रुग्णांनी या इन्फेक्शनमुळे जीव गमावला आहे. नुकतंच बिहारच्या पाटणामग्ये ब्लॅकनंतर आता व्हाईट फंगसचे रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे, चिंतेत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे.

राजस्थाननंतर आता गुजरातनंदेखील या आजाराला महामारी घोषित केलं आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांनी साथीचा आजार अधिनियमांतर्गत हा एक उल्लेखनीय आजार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर म्यूकरमायकोसिसचं प्रत्येक प्रकरणाची माहिती या राज्यांतील राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक झालं आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की राज्याला 1.50 वायल्सची गरज आहे. मात्र, केंद्रानं केवळ 16 हजार वायल उपलब्ध करुन दिल्या आहेत.

You May Also Like