करोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’ : ममता बॅनर्जी

कोलकाता : देशात ऐकीकडे करोनाने हाहाकार माजवला तर दुसरीकडे पश्चिम बंगाल विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतत राजकारण तापत आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत मोठा आरोप केला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ”मोदी-निर्मित Tragedy” आहे, असे ममतांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे नेतृत्व ”बंगाल इंजिन” सरकारच करेल, मोदींचे ”डबल इंजिन” सरकार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्या एका निवडणूक सभेत बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, ”क रोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.” यावेळी ममतांनी, ही निवडणूक पश्चिम बंगालला वाचविण्याची आणि बंगाली मातांचा सन्मान वाचविण्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.

आपले राज्य बंगाल इंजिन सरकार चालवेल, मोदींचे डबल इंजिन सरकार नाही. आम्ही गुजरातला आपल्या राज्यावर कब्जा करू देणार नाही आणि दिल्लीवरून सरकार चालवू देणमार नाही. बंगालवर बंगालच राज्य करेल. भाजप नेते, आपल्या निवडणूक सभांतमधून जनतेला, राज्यात डबल इंजिन सरकार बनविण्याचे आवाहन करत आहेत. याचा अर्थ केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, असा होतो.

तसेच, त्या म्हणाल्या कि,  मी लोकांना विनती करेल, की जर करोनाची अधिक लक्षणे नसतील, तर त्यांनी घरातच आयसोलेट व्हावे, असेही ममता म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी हलकी लक्षणं असलेल्या करोना रुग्णांना सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like