दुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 4 ऑगस्टपासून सुरुवात

दोन वर्ष चालणार स्पर्धा!
नवी दिल्ली । पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय सघांला हरवत न्यूझीलंडने विजयावर शिक्कामोर्तब केलं. पहिली स्पर्धा संपल्यानंतर आता पुढच्या महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट 2021पासून दुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी नेमके सामने कसे होणार आहेत, याची माहिती आयसीसीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केली आहे. त्यासोबतच, यावेळी काही प्रमाणात गुण देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. त्याविषयी देखील आयसीसीकडून माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण दोन वर्षांच्या कालावधीमध्ये टीम इंडिया देखील 6 सीरिज खेळणार असून यामध्ये तीन सीरिज इतर देशांमध्ये खेळणार आहे. त्यात बांगलादेश, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तर भारतात होणर्‍या सीरिजमध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरोधातील सीरिजचा समावेश आहे.

अशी असणार पॉइंट देण्याची पद्धत!
2021 ते 2023 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार आहे. या दरम्यान प्रत्येक सामना जिंकणार्‍या संघाला 12 पॉइंट दिले जातील. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 6 गुण तर सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित झाला, तर 4 पॉइंट दिले जातील.

असे होणार सामने!
दुसर्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला पुढील महिन्यात 4 ऑगस्टला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. पहिल्या चॅम्पियनशिपप्रमाणेच याही वेळी प्रत्येक संघाला एकूण 6 टेस्ट मॅच सीरिज खेळाव्या लागणार आहेत. यापैकी 3 इतर देशांमध्ये तर 3 स्वदेशात खेळाव्या लागणार आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!