जहाजामध्ये आग लागली होती त्यामुळे ही दुर्गघटना घडली आहे

तेहरान – इराण मध्ये समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सर्वात मोठे खर्ग नावाचे लढाऊ जहाज बुडाले आहे. या जहाजामध्ये आग लागली होती त्यामुळे ही दुर्गघटना घडली आहे. जहाजावर जवळपास 400 कर्मचारी होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. गल्फ ऑफ ओमानमध्ये ही घटना घडली असून यासंदर्भात इराण मीडियाने माहिती दिली आहे.

हे जहाज आंतरराराष्ट्रीय समुद्री भागात युद्ध सरावासाठी तैनात करण्यात आले होते. सरावावेळी अचानक या जहाजास आग लागली. आग इंजिन भागात लागली होती. त्यामुळे जहाजाचे अनेक भाग वितळले आणि पाण्यात पडले. आज विझविण्यासाठी जवळपास २० तास पर्यंत केले पण यामध्ये यश मिळाले नाही. आग लागली त्यावेळी या जहाजावर ४०० कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी ३३ कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र इराणचे मोठे आर्थिक आणि लष्करी नुकसान झाले या आगीमुळे झाले आहे.

खर्ग या लढाऊ जहाजाच्या दुर्घटनेचा नौदल कमांडर आणि अनेक वरिष्ठ अधिकारी याप्रकरणाचा तपास करणार आहेत. या जहाजावर मोठ्या प्रमाणात तेल साठ्याची क्षमता होती. शिवाय जड लष्करी उपकरणे वाहून नेण्याचीही याची क्षमता आहे. यावरुन मोठे हेलिकॉप्टरही वाहून नेले जाऊ शकतात. त्यामुळेच या सामरिकदृष्टा महत्त्वाच्या जहाजावर शत्रूंचा डोळा होता. असे असले तरी इराणने यासाठी कोणाला जबाबदार धरले नाही आहे.

You May Also Like