जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता

डब्लू.एच.ओ.ने दिला इशारा 

नवी दिल्ली ।  जगभरातील देशांनी लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सर्वांनीच डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

 

 

सर्वच देशांनी या वर्षाच्या सप्टेंबर अखेर आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.  तर जगभरातील 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा प्रसार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केल्यामुळे याचा अधिक प्रसार होण्याआधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You May Also Like