”पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा” ट्विटरवर युझर्सची मागणी

नवी दिल्ली: देशातील करोनाची परिस्थिती  हाता  बाहेर चालली आहे.  तर दुसरीकडे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुऱ्या पडत असताना करोना लसीचा तुडवडा जाणवत आहे. अशातच देशातील करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ट्विटर युझर्सनी काल (सोमवारी) केली. ट्विटरवर २ लाख युझर्सनी हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘निरो’शी केली.

#ResignModi चा वापर

ट्विटर युझर्सनी #ResignModi या हॅशटॅगचा वापर करत सदर मागणी केली. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि डाव्या पक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश असल्याचे पाहायला मिळाले. सर्व भारत कोरोनाशी लढत असताना, भाजप मात्र पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लढत आहे, असा आरोपही अनेकांनी केला. याशिवाय विविध प्रकारचे फोटो, कार्टून, व्हिडिओ ट्विटरवर हॅशटॅग वापरून शेअर केले.

दरम्यान, बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनीही यामध्ये सहभागी होत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा ‘निरो’ बासरी वाजवत होता, अशी टीका यादव यांनी केली आहे. देशातील जनतेचे संरक्षण करू शकत नसाल, तर अशा पंतप्रधानाची देशाला गरज काय, अशी विचारणा काँग्रेस नेते असलम बाशा यांनी केली असून, पंतप्रधान मोदींनी जमिनीवर येऊन काम करावे, अशी मागणी केली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like