मुंबई : शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. एक एक करून अनेक आमदार शिंदे गटात गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील सहा मंत्री देखील शिंदे गटाला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. . एकनाथ शिंदे यांच्याकडे सेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचं बोलले जात तसेच 6 अपक्ष आमदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. 10 वाजता हॉटेल रेडिससन मधुन शिंदे गटाची महत्वाची बैठक घेतली जात असून आज आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र ते राज्यपालांना देणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोन तृतीआंश शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हेही स्पष्ट दिसत आहे.
आमदार- खासदार यांच्यासह आता मुंबईतील सेनेचे काही नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या टच मध्ये असल्याचे समजले आहे. जणू संपुर्ण शिवसेना शिंदेंच्या बाजूने, असल्याचेही आता बोलले जात आहे.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…