लॉकडाऊनच्या आदेशाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला दिलासा

नवी दिल्ली: देशातील करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून, उत्तर प्रदेशमध्येही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. संपूर्ण देशात सध्या करोना रुग्णांची संख्या चिंतादायक आहे. अनेक राज्यातील परिस्थितीही अतिशय गंभीर आहे.

दरम्यान,उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी योगी सरकारला दिलासा दिला आहे.

मात्र, या निकालाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला दिलासा दिला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कोरोनाच्या गंभीर होत चाललेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लखनऊ, वाराणसी, कानपूर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी सक्तीचा लॉकडाउन लागू करावा, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला देत दणका दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. योगी सरकारची याचिका लगेच दाखल करून घेत त्यावर तातडीची सुनावणी करण्यात आली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like