तालिबानींनी काबूल विमानतळावरून 150 नागरिकांना उचलले

भारतीयांचा समावेश असल्याची भीती

नवी दिल्ली । अख्खा देश तालिबान्यांच्या तावडीत सापडला असताना सर्वांच्या नजरा काबूल विमानतळावर लागल्या आहेत. देश सोडण्यासाठी हाच एकमेव मार्ग लोकांना दिसत आहे. विविध देशांचे विमान या ठिकाणावरूनच आप-आपल्या नागरिकांना नेण्याच्या तयारीत आहेत. याच दरम्यान काबूल विमानतळावरून तालिबानने 150 जणांना पकडून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालिबानने या लोकांना कागदपत्रांच्या कामानिमित्त दुसरीकडे नेले असावे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारल्यानंतर त्यांनी सध्या अशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही असे सांगितले आहे.

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानने विमानतळावरूनच 150 च्या जवळपास लोकांचे अपहरण केले. यामध्ये प्रामुख्याने भारतीयांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना तालिबानने कुठे नेले याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी त्यांना दुसऱ्या मार्गाने नेले जात असावे अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तालिबानी प्रवक्त्याने अफगाणी मीडियाच्या प्रश्नाचे उत्तर देताना कुणाचेही अपहरण केले नाही असा दावा केला आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!