भावनिक आवाहनाने दहशतवादी स्वत: आला शरण

श्रीनगर : हांजिपोरामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर आणखी एक दहशतवादी लपून बसला होता. ज्याला सैन्याच्या जवानांनी आपल्या हटके स्टाईलनं आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं. भारतीय सैन्याने दहशतवाद्याला सरेंडर करण्यासाठी हटके आयडिया वापरली आहे. शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात हांजीपोरामध्ये स्वतःहून दहशतवाद्याला सरेंडर केलं आहे.

सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्याला त्याच्या कुटुंबाचा आणि मित्राचा माहिती दिली. त्यानंतर दहशतवादी त्याच्या एके56 रायफलसोबत सरेंडर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. घटनास्थळी पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरु केली. त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा लपून बसला होता.

जवानांनी दहशतवाद्याला सांगितले की, हातातलं शस्त्र सोडून बाहेर आलास तर काही होणार नाही. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्याला त्याच्या कुटूंब आणि मित्रांचा संदर्भ दिला. जवानांनी म्हटलं, आपल्या कुटुंबाचा विचार कर, तुझ्या साथीदाराचं काय झालं त्याचा विचार कर, तू गेल्यानंतर तुझ्या कुटुंबाचं काय होईल, त्याबद्दल विचार कर. भारतीय सैन्याच्या या भावूक आवाहनानंतर दहशतवाद्यानं स्वतःहून सरेंडर केलं.

You May Also Like

error: Content is protected !!