कृष्णा नदीचे पाणी गावात शिरले; ८०० लोकांची सुटका

पुणे ।  कृष्णा नदीचे पाणी जवळच्या खेड्यात शिरले. आतापर्यंत 700 ते 800 लोकांची सुटका करण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. नुकसानाचे प्रमाण व सध्या सुरू असलेल्या मदत कारभाराचा आढावा घेण्यासाठी अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींची घेतली भेट.

 

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडमधील तळीये स्थळाला भेट दिली. तर तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली.

 

बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाल्यासंदर्भात चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिपळूणात घरोघरी जाऊन नुकसानाची पहाणी देखील केली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांसह संवाद साधल्यानंतर स्थानिक प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार. ही आढावा बैठक चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये होणार आहेत.

 

 

You May Also Like