वेबसाईट पुन्हा सुरु होण्यास लागेल ‘इतका’ वेळ

मुंबई ।  दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आज दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र लाखी विद्यार्थी एकाच वेळी निकाल बघत आहेत. त्यामुळे बोर्डाची निकालाची क्रॅश झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल बघण्यात अडचणी येत आहे. मात्र आता ही वेबसाईट क्रॅश का झाली आणि पुन्हा सुरु होण्यास किती वेळ लागेल याबद्दल माहिती मिळाली आहे.

 

http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या वेबसाईटवर वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश झाल्याची माहिती मिळते. बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अचानक वेबसाईटचे हिट्स वाढल्यानं वेबसाईट क्रॅश झाली आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं ही साईट क्रॅश झाल्याची माहिती आहे. मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी कमीतकमी दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे आहसी माहिती सूत्रांनी दिली आहे.तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये प्रयत्न करत राहावेत. घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.

You May Also Like