त्या मशीनमधील दृश्य पाहून महिलेला बसला जोर का झटका, शेअर केला फोटो

लंडन : आपल्या नकळत काही भटके प्राणी आपल्या घरांमध्ये प्रवेश करतात. असंच आणखी एक प्रकरण आता समोर आलं आहे. या घटनेत नताशा प्रयाग नावाच्या एका महिलेला आपल्याच घरात एक भलतंच दृश्य पाहायला मिळालं. घरातील वॉशिंग मशीनमध्ये चक्क एक कोल्हा या महिलेला दिसला. या कोल्ह्याला घरात पाहून महिलेला धक्काच बसला.

घरामध्ये शिरल्यानंतर कोल्हा लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होता आणि यासाठी त्याला वॉशिंग मशीन उत्तम पर्याय वाटला आणि तो वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसला. तिनं लगेचच त्याचा एक फोटो काढत तो ट्विटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये कोल्हा वॉशिंग मशीच्या आतमध्ये बसलेला दिसत आहे. या महिलेनं फोटो काढताच कोल्हा घराच्या बाहेर पडला. मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, नताशा आणि तिचा पती आपल्या कारमधून बँग बाहेर काढत होते, याचवेळी हा कोल्हा घरामध्ये शिरला. मात्र, या कपलला याबाबत काहीही कल्पना नव्हती.

याबाबत नताशानं सांगितलं कि, घरामध्ये अंधार असल्यानं खरंच कोल्हाच आहे का, याची खात्री आम्हाला करुन घ्यायची होती. माझा पती किचनमध्ये त्याचा शोध घेत होता. मात्र, अचानक आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये एक लहानसा कान दिसला. वॉशिंगमध्ये कोल्हा पाहून सुरुवातीला आम्हाला धक्का बसला मात्र नंतर उत्सुकता निर्माण झाली. यानंतर कोल्ह्यानं घरातून पळ काढला.

You May Also Like

error: Content is protected !!