बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नामवित महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो |  भारतीय हाॅकी महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना नुकताच पार पडला. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल अशी सर्वांनाच आशा होती. पण भारतीय संघाने जोरदार पलटवार करत सामना 0-1 अशा फरकाने हा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत धडाकेबाज प्रवेश मिळवला आहे.

 

भारताकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडू मैदानातच डोकं धरुन बसल्याचं पहायला मिळालं.

 

 

सुरूवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. 22 व्या मिनिटाला गुरजीत कौरने आक्रमक गोल दागला. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. पुर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 पेनल्टी काॅर्नर मिळाले. या 7 सुवर्णसंधीचा त्यांना फायदा उचलता आला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रथमच भारतीय महिला हाॅकी संघ पोहोचला आहे.

You May Also Like

error: Content is protected !!