जगाने पाहिला तेजस्वी सुपरमून आणि ब्लड मून

नवी दिल्ली : भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसले नसले तरी ईशान्य भागात खंडग्रास चंद्रग्रहण पाहावयास मिळाले. असा ब्लड मून आणि सुपरमून एकाच वेळी पाहण्याचा हा योग तब्बल सहा वर्षांनंतर आला. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा 7% मोठा आणि 14% जास्त तेजस्वी दिसतो त्याला सुपरमून म्हणतात. जगात काही ठिकाणी लाल चंद्र दिसला, तर कुठे तप्त अग्निगोलासारखा पिवळा.

दर्शन सुपरमूनचे
बुधवारी बुद्धपौर्णिमेला सायंकाळनंतर औरंगाबादकरांना सुपरमूनचे दर्शन झाले. या वेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर या वर्षातील सर्वात कमी 3 लाख 57 हजार 463 किलोमीटर होते. त्यामुळे चंद्रबिंब 14 टक्के अधिक तेजस्वी, 30 टक्के मोठे दिसले. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ल्यूथर फिल्टरच वापर करत दुर्बिणीद्वारे टिपलेले सुपरमूनचे छायाचित्र.

एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी छायाचित्र टिपलेले आहे.


दिल्लीमध्ये सुपरमून, ब्लडमून चंद्रग्रहण एकत्र दिसले.

देनपसार शहरातील टीती बांदा पार्कमधील चंद्र काहीसे असेच दिसत होते.

सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई पार्क मधील सुपरमूनचे दृश्य.

अहमदाबादहून ब्लडमूनचे नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळाले.

ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील क्रिस्ट दी रीडीमरच्या पुतळ्यामागील चंद्र दृश्य.

रशियाच्या रोशॉश शहरातील ऑर्थोडॉक्स चर्चमागील सुपरमूनचे दृश्य.

ऑस्ट्रेलियामधील सिडनी ओपेरा हाऊसमागील चंद्रग्रहणाचे दृश्य.

तुर्कीच्या अंकारा येथील मुस्तफा कमल अतातर्क म्युझियमजवळील सुपरमून यासारखे दिसत होते.

You May Also Like