लग्नाच्या 100 व्या दिवशीच तरुणीने केली आत्महत्या; चौघांवर गु्न्हा

कोल्हापूर ।  सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या शंभराव्या दिवशी  तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. नेहमीचा त्रास सहन न झाल्याने  विषप्राशन  करून जीवनयात्रा संपविली.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,  राधानगरी तालुक्यातील साक्षी उर्फ रुपाली डोंगळे यांचा विवाह इचलकरंजीत राहणाऱ्या संदीप डोंगळे यांच्याशी झाला होता. 2 मे 2021 या दिवशी लग्न झाल्यानंतर 100 दिवसांत साक्षीचा छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तिचा पती संदीप डोंगळे, सासू आकुबाई डोंगळे, सासरे साताप्पा डोंगळे आणि पोलिसांत असलेला दीर सुशांत डोंगळे या चौघांनी साक्षीचा छळ केल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांची आहे.

 

या जाचाला कंटाळून तिने दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्यायले होते. यानंतर तिचा मृत्यू झाला. विषारी औषध प्यायल्यानंतर साक्षीला भोगावतीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिच्यावर पुरेसे उपचार होऊ शकत नसल्याचं लक्षात आल्यावर तिला कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

You May Also Like