दिघावे येथील विद्यालयातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत

साक्री । दिघावे (ता. साक्री) येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयातून अज्ञात चोरट्यांनी दुरचित्रवाणीसंचासह, संगणक, प्रिंटर आदी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. साक्री पोलिसांनी तपास करीत गुन्ह्याचा उलगडा केला असून मुद्देमाल हस्तगत केला. त्या वस्तू विद्यालय प्रशासनाच्या स्वाधीन केल्या.

दिघावे गावातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात दि.19 जानेवारी 2019 रोजी अज्ञातांकडुन चोरी करण्यात आली यात टीव्ही, संगणक, प्रिंटर तसेच विद्यालयातील घरेलू गिरणी अशा वस्तू लांबविण्यात आल्या होत्या. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक कल्याण अहिरराव यांनी साक्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता.

साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पाटील, संजय शिरसाठ, विजय पाटील, नागेश सोनवणे, जगदीश अहिरे, राजू जाधव, रोहन वाघ, गुलाब शिंपी यांनी शिताफीने तपास केला. संशयित विशाल भोये, दिनेश चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन विद्यालयातील वस्तू हस्तगत केल्या. पोलिस प्रशासनाने तपासाची सूत्रे योग्य दिशेने फिरवून या चोरीचा घटनेतील आरोपींना तसेच चोरी झालेल्या वस्तू हस्तगत केल्या.

You May Also Like

error: Content is protected !!