”…तर महाराष्ट्रावर येऊ शकते मोठे संकट” : नवाब मलिक

मुंबई : राज्यातील करोनाची स्थिती अतिशय गंभीर असून, हि परिस्थिती हाताबाहेर गेलीय. रुग्णांना अक्षरशः आरोग्य सुविधांचा तुटवडा सहन करवा लागतोय. यात मुख्यता ऑक्सिजन आणि र रेमडेसिविर औषधाचा तुटवडा राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकत आहे. या दरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्राला यामध्ये दररोज २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी जाहीर केली आहे.

याबाबत ट्विट करत नवाब मलिक यांनी राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यावर मोठे संकट येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी पुढे म्हटले आहे की, नुकतेच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे.

तसेच, आम्हाला आतापर्यंत दररोज ३६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दररोज २६ हजार इंजेक्शन्स मिळणार असल्यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यावर मोठे संकट येऊ शकते, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला केंद्र सरकारने दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देऊन राज्यातील नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी पुढे केली आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like